नाशिक: पोलिसांनी पकडला अवैध मद्यसाठा; शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कारवाई

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरात अवैधरीत्या दारू विक्री व साठ्याविरोधात शहर पोलिसांनी करडी नजर ठेवत कारवाई सुरू आहे. याअंतर्गतच शहर पोलिसांच्या विशेष शाखेने तिघांना अटक केली असून त्यात एकाकडून ६० हजारांचा तर, इतर दोघांकडून ५८ हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अवैध धंदे, अवैधरीत्या दारू वाहतूक व विक्री, अमली पदार्थ विक्री, साठा व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विशेष पथकाचे अंमलदार देवकिसन गायकर यांना देशी-विदेशी दारूच्या अवैध वाहतुकीची खबर मिळाली होती. पथकाने इंदिरानगरमधील संत सावता माळी मार्गावर सापळा रचून, मारुती कार (एमएच १५ जेएम २६५६) अडवून तपासणी केली.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

चालक संशयित रोहिदास रघुनाथ पगारे (५०, रा. जेलरोड) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६३ हजार ६६० रुपयांची देशी-विदेशी मद्यसाठा आणि ३ लाखांची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, नांदूर नाका परिसरातून अवैध मद्याची वाहतुकीची खबर अंमलदार रवींद्र दिघे यांना मिळाली होती.

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

त्यानुसार, विशेष पथकाने नांदूर नाका परिसरात सापळा रचला. संशयित राहुल श्याम वाघ (३२) याच्याकडून अवैध देशीदारुचा साठा व मोबाईल असा ३२ हजार ८८० रुपयांचा मुददेमाल तर, करण संतोष जगताप (२१, दोघे रा. नांदूरनाका) याच्याकडून अवैध देशीदारुचा साठा व मोबाईल असा ५८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार भरत डंबाळे, रवींद्र दिघे, योगेश चव्हाण, दत्तात्रेय चकोर यांनी कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790