नाशिक। दि. २५ ऑक्टोबर २०२५: परिसरातील पंडित नगर येथे फूटपाथवर झोपलेल्या एका ४२ वर्षीय नागरिकाचा अज्ञात वाहनाच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत व्यक्तीचे डोके चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आले आहे.
अर्जुन तुळशीराम महाजन (४२) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते सिडको परिसरातच वास्तव्यास होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ रोजी रात्री सुमारे पावणे दहा वाजेच्या सुमारास, पंडित नगर परिसरात रस्त्याच्या कडेला अर्जुन महाजन हे झोपलेले असताना अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की, त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
वाहनचालक मात्र अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मयत अर्जुन महाजन हे एकटेच राहत होते.
![]()

