नाशिक: भात खराब दिल्याची कुरापत काढून हॉटेलमध्ये गोंधळ घालत टोळक्याची दोघांना मारहाण…

नाशिक (प्रतिनिधी): गौळाणे – पाथर्डी मार्गावर भात खराब दिला या कारणातून टोळक्याने हॉटेलमध्ये गोंधळ घातल्याची घटना घडली.

या घटनेत लाकडी दांडक्याने दोन कर्मचा-यांना मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आधारभूत दरानुसार होणार चना खरेदी; शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत नोदंणीची संधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित दिनेश शिवाजी गवळी (रा. पाथर्डीगाव) व त्याचे चार साथीदार अशी हॉटेलमध्ये गोंधळ घालणाऱ्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रथमेश संदेश देवरे (रा. एकता चौक, उत्तमनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.

देवरे यांचे गौळाणे रोडवरील गरजा बिल्डींग शेजारी साई आनंद नावाचे हॉटेल आहे. गुरूवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. जेवणासाठी आलेल्या संशयितांनी भात खराब दिल्याची कुरापत काढून हॉटेलमध्ये गोंधळ घातला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 6 मार्च रोजी आयोजन

यावेळी संतप्त टोळक्याने शिवागाळ व दमदाटी करीत देवरे यांच्यासह दुर्गेश इंगळे नामक कामगारास लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेत दोघे जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790