खळबळजनक! करवंदे विक्रीसाठी आलेल्या अल्पवयीन गतिमंद मुलीचे 1 लाखात लावले लग्न

नाशिक (प्रतिनिधी): करवंदे विक्रीसाठी आलेल्या गतिमंद अल्पवयिन मुलीला फूस लावून जळगाव येथे नेत एका लाखात विक्री करत तीचे लग्न लावून देणाऱ्या संशयित महिलेसह दोन जणांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपीना पकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, परदेशवाडी ( ता. इगतपुरी ) येथील माहेर असलेली महिला सुरेखा योगेश पाटील हिची करवंदे ( रानमेवा ) खरेदी करतांना एका अल्पवयिन गतिमंद मुलीची ( वय १७ वर्ष नऊ महिने ) ओळख झाली.

तीला विश्वासात घेऊन तिच्या गतिमंद पणाचा फायदा उचलत सुरेखा पाटील ह्या महिलेने अल्पवयीन मुलीस सुरेखा पाटील हिचा पती योगेश शांताराम पाटील रा. कासोदा ता. एरंडोल जिल्हा जळगाव या दोघांच्या संगनमताने त्यांनी सदर मुलीस तिच्या घरच्यांना काही न सांगता अथवा संपर्क न करता तीला घोटी येथून जळगाव जिल्ह्यात कासोदा येथे नेत मनोज राजू शिंपी ह्यास एक लाख रुपयात विक्री करून कुठेही वाच्यता न करता एका घरात लग्न लावून दिले.

तिच्यावर जबरदस्ती लैंगीक अत्याचार झाल्याने तिने त्यास विरोध करण्यासाठी सुरवात केली. मात्र घरदाराचा पत्ता देखील तीला व्यवस्थित कोणाला सांगता येत नसल्याने तिच्यावर महिनाभर अनेकदा विविध त्रास वाट्याला येत असतांना वाच्यता करता सहनही होईना आणि सांगता येईना अशी अवस्था त्या मुलीची झाली होती.

पीडित मुलगी बेपत्ता म्हणुन तिच्या घरच्यांनी अनेकदा तालुक्याचा परिसरात शोध घेतला होता. अखेर त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली होती. यावरून नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फूस लावून नेणाऱ्या महिलेची पार्शभूमी पाहता आपल्या गोपनीय खबऱ्या मार्फत अखेर त्या मुलीचा शोध लावून संशयित आरोपिंना शिताफीने अटक केली.

पोलीसी खाक्या दाखवताच ते पोपटा सारखी घटनेचे कथन पोलिसांसमोर करून गयावया करू लागले. गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु आतांनाच व पोलिसांपुढे रोजचे मंत्री मोहदय यांचे दौरे त्यातील पायलेटिंग, स्थानिक गुन्हे, कर्मचारी संख्याबळ कमी, पोलीस ठाण्याचा भौगलिक विस्तार मोठा आसल्याचा फायदा या सराईत महिलेने घेत पोलीस ठाण्यातून चहा पिण्याच्या नादात पळ काढला मात्र पोलिसांनी सीताफिने पोलिसांना पुन्हा अटक करण्यात यश आले.

सदर संशयित आरोपी असलेल्या महिलेने या आधी अनेक तरुणांना विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकले असल्याचे अनेक पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आल्यावर उघड झाले. अनेक लग्न देखील लावून दिल्याचे सांगण्यात आले. या गंभीर घटनेचा तपास घोटी पोलीस करीत आहे.

“सदर घटना गांभीर्यपूर्ण आहे. सदर मुलीचा अज्ञानाचा गैरफायदा घेतला असून त्यांच्या कुटुंबियांच्या माघे श्रमजीवी संघटना ताकतीनीशी उभी राहिल. याबाबत आदिवासी कृती आढावा समिती अध्यक्ष ना. विवेक पंडित यांना देखील माहिती देण्यात आली असून संशयित गुन्हेगार यांची पार्शभूमी पाहता भयानक वृत्त आहे.”– संजय शिंदे, श्रमजीवी संघटना

“सदर कुटुंब गरीब व त्यांच्या अज्ञानी पणाचा फायदा सराईत गुन्हेगार यांनी घेतला आहे. सदर महिलेने या अगोदर अनेक गुन्हे केले असून तिची कसून चौकशी करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल. “– निवृत्ती आगीवले, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते इगतपुरी

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group