नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयितास दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याकरीता दरोडा व शस्त्र विरोधी पथक तयार करून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त गुन्हे सिताराम कोल्हे यांनी सदरहू गुन्हेगारांची माहिती कादुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
या अनुषंगाने पथकाने शहरात आपल्या खबऱ्यांमार्फत माहिती घेणे सुरु केले होते.(दि.६) गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार की इंदीरानगर पोलीस स्टेशन हद्दीत पांडुरंग उर्फ अजिंक्य तुकाराम काळे (२०,रा. रो हाउस नं. ११, आनंद नगर, पाथर्डीफाटा, नाशिक) हा हातात तलवार सारखे हत्यार घेवुन आनंद नगर, पाथर्डीफाटा परिसरात फिरत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे.
यावरून दरोडा व शस्त्र विरोधीपथकातील सहाय्यक निरीक्षक किरण रोंदळे, अंमलदार विजयकुमार सुर्यवंशी, मोहन देशमुख, संदीप डावरे, महेश खांडबहाले, महेंद्र साळुंखे, प्रविण चव्हाण,मनिषा कांबळे यांनी सापळा रचून काळे याला पकडून त्याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.