नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मित्राची बाजू का घेतो म्हणून किरकोळ वादातून दोन जणांनी मिळून एकाचा खून केल्याची घटना शनिवार रात्री घडली.
याप्रकरणी समशेर रफिक शेख, दीपक अशोक सोनवणे हे दोन संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वनाथ उर्फ बबलू भीमराव सोनवणे वय 27 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी नाशिक पोलीस आयुक्तालयाची हद्दीतील गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. आरोपींनी अपघाताचा बनाव रचून सिव्हिलमध्ये दाखल केले परंतु पोलिसांनी वेळीच हेरून दोघांना अटक केली.
मयत व आरोपी मित्र असल्याचे समोर आले आहे. आरोपी विरुद्ध याआधी आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल आहे. अंबड पाठोपाठ गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की काय घडलं..:
दोन दिवसांपूर्वी मित्र मित्रा मध्ये शिवीगाळ होऊन वाद झाले. आणि एक मित्राने शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली म्हणून मित्रानं तिसऱ्या मित्राचा खून केल्याची घटना नाशिक शहरात घडलीय. विशेष म्हणजे हल्ला करणाऱ्या मित्राने जखमी मित्राचा अपघात झाला असल्याचा बनाव करून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र पोलीस चौकीतील कर्मचारी पी एस जगताप आणि शरद पवार यांना संशय आल्याने त्यांनी समशेर रफिक शेख आणि दीपक अशोक सोनवणे यांनी कसून चौकशी केली. यावेळी दोघांची विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि चौकीवर असलेले पोलीस हवालदार पी. एस. जगताप आणि पोलीस कॉन्स्टेबल शरद पवार यांनी दोघांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यात चौकशीत या दोघांनी दारूच्या नशेत हल्ला केल्याच त्यांनी पोलिसांना सांगितलंय. शनिवारी रात्री सातपूर येथील कार्बन नाका येथील महादेव मंदिराजवळ समशेर शेख आणि दीपक सोनवणे आणि मयत विश्वकांत सोनवणे पाटील हे दारू पिण्यासाठी बसले होते.
यावेळी तिघांमध्ये काही वाद झाले यानंतर समशेर शेख याने जवळच असलेल्या गुप्तीने विश्वनाथ उर्फ बबलू भीमराव सोनवणे याच्यावर हल्ला केला यानंतर समशेर आणि दीपक यांनी त्याला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघात झाला असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र रुग्णालयातील पोलीस चौकीतील पोलीस हवालदार पी एस जगताप आणि पोलीस अंमलदार शरद पवार यांच्या सतर्कतेने हा अपघात नसून खून असल्याचं उघड झालाय.