नाशिक: वाढदिवसाला पिस्तुलासह इन्स्टावर फोटो टाकणाऱ्या युवकास अटक

नाशिक (प्रतिनिधी): वाढदिवसाला पिस्तोल घेऊन फोटो काढला आणि तो फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करणार्या १९ वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

गुरुविंद सिंग यशपाल सिंग हुंदल (१९, रा. त्रिमूर्तीनगर, हिरावाडी, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पिस्तुल्याचे नाव आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शहरात पावसाचे धुमशान; विविध भागात झाडे कोसळली

शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पोलीस अंमलदार विशाल देवरे यांना सोशल मीडियाच्या इन्स्ट्राग्रामवर संशयित गुरुविंद सिंग याने वाढदिवसाला पिस्तोलासमवेतचा फोटो व्हायरल केल्याचे माहिती मिळाली होती.

त्याबाबत खातरजमा केल्यानंतर सदरील माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी (ता. २५) सापळा रचून संशयिताला हिरावाडीतून अटक केली.

👉 हे ही वाचा:  आपत्कालीन स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या 'या' सूचना…

त्याच्याकडून ३० हजारांचे देशी बनावटीचे पिस्तोल, दोन जिवंत काडतुसे, असा ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात आर्म ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: आज (दि. १०) पाणी पुरवठा नाही; उद्याही कमी दाबाने पुरवठा

सदरची कामगिरी हवालदार प्रदीप म्हसदे, संदीप भांड, योगीराज गायकवाड, विशाल काठे, प्रशांत मरकड, पालखेडे, नाझीम पठाण यांनी बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790