🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: केटीएचएम कॉलेजच्या आवारात तरुणाला मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): गंगापूररोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात एका तरूणास त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

या घटनेत लाकडी स्टंपने मारहाण केल्याने १९ वर्षीय तरुण जखमी झाला. या घटनेत तरुणाची दुचाकीचे नुकसान करुन मोबाईल फोडण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तिडके कॉलनीतील मिलिंदनगरची अतिक्रमणे जमीनदोस्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल ज्ञानेश्वर खाडे (१९, रा. कारगिल चौक, दत्तनगर अंबड लिंकरोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खाडे गुरूवारी (दि.२४) महाविद्यालय सुटल्याने आपली दुचाकी घेण्यासाठी पार्किंगमध्ये आला असता ही घटना घडली.

संशयित कार्तिक जाधव व त्याच्या दोन मित्रांनी त्यास गाठून कुठलेही कारण नसतांना खाडे यास शिवीगाळ करीत लाकडी स्टंम्पने बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त त्रिकुटाने त्याच्या खिशातील मोबाईल आणि दुचाकी फोडून मोठे नुकसान केले. जखमी खाडे याच्यावर उपचार सुरू असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790