नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): माहेरून ट्रॅक्टरचे हप्ते भरण्यासाठी पैसे आण असे सांगून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रेखा पवार (४०, रा. वडगाव, जि. संभाजीनगर) यांची मुलगी प्रियंकाचा विवाह सुनील बर्वे यांच्यासोबत २०२० साली झाला होता. तेव्हापासून पती व सासरचे लोक तिच्याकडे ट्रॅक्टरचे हप्ते भरण्यासाठी माहेरून पैसे आणण्यास दबाव वाढवत होते. तसेच प्रियंकाचा पती सुनील तिच्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून मारहाण करायचा, प्रियंकाला घरी घेऊन येण्यासाठी तिच्या घरी पवार गेले असता सुनील यांनी त्यांना मारहाण केली होती.
म्हणून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यावेळी तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली होती. एक वर्ष प्रियंका माहेरी राहिली. त्यानंतर तिचा पतीने आम्ही प्रियंकाला चांगले वागवू असे म्हणून घेऊन गेला. प्रियंका व पती सुनील यांना नंदोई अनिल सुपेकर त्यांच्या घराजवळ (रा. पाथर्डी फाटा) येथे राहण्यासाठी घेऊन गेले होते. सोमवार (दि.१९) सायंकाळी सुनील यांनी पवार यांना फोन करून प्रियंकाने झुरळ मारायचे विष सेवन केले, असे कळविले. रात्री नऊ वाजता प्रियंकाचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.
यांच्यावर कारवाई:
मयत विवाहितेचा पती सुनील बर्वे (पती), कांता बर्वे (सासू), साहेबराव बयें (सासरे), अनिल बर्वे (जेठ), रेखा सुपेकर (नणंद), सुरेखा बरकले, अनिल सुपेकर, कौतिक बरकले, अक्षदा बर्वे यांनी दबाव वाढवून घळ करत आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790