नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक/पुणे/मुंबई (प्रतिनिधी): नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात नवनवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत असून आता नाशिकमधील सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आल्याचे समोर आले आहे.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणी सराफा व्यावसायिकाची चौकशी होणार आहे. कारण ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने नाशिकमधून सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित सराफ व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहेत.
नाशिकचं ड्रग्ज प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असून राज्यातील तीन पोलिसांच्या टीम्स या प्रकरणात लक्ष घालत असल्याने वेगवगेळ्या ठिकाणाहून नवी माहिती समोर येत आहे. कालच संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालची नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला.
अशातच एक माहिती माहिती माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिकमधील सराफ व्यावसायिकाचा जात असल्याचे समोर आले असून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलने येथील सराफ व्यावसायिकाकडून सोने खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तब्बल आठ किलोचे सोने खरेदी केले असून यापैकी 3 किलो सोने हस्तगत, उर्वरित 5 किलो सोने जप्त करणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान आता नाशिकचा सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर असून त्याच्याकडून ड्रग्सच्या पैशातून भूषण पाटीलने सोने खरेदी केल्याचं उघड झाले आहे. आठ किलो सोने खरेदी करून तो पसार झाला होता. आता पोलिसांनी संबंधित आठ किलो सोन्यापैकी 3 किलो सोने हस्तगत केले असून उर्वरित 5 किलो सोने जप्त करणे बाकी आहे.
हे उर्वरित सोने कुठे लपवले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकच्या कोणत्या सराफाकडून सोने खरेदी केले, याची चौकशी सुरू असून ललित पाटीलचे सराफ व्यावसायिकासोबतचे कनेक्शन उघड होणार आहे.