HomeAd

नाशिक: घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाचा ऐवज केला लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाच्या ऐवज लंपास केला. रेहनुमा नगर भागात झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरुन नेली. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: महिलांच्या तक्रार निवारणासाठी राज्य महिला आयोग सदैव कटिबद्ध- रूपाली चाकणकर

मुद्दतसर अली मोद्दीन सय्यद (रा. टावर नं.१ अपा. रेहनुमा स्कूलजवळ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सय्यद कुटुंबिय १५ ते १८ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: नोकरीचे आमिष दाखवून १.३७ कोटींचा गंडा; ९० जणांची फसवणूक

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे ३ लाख ४७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक सय्यद करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790