NC

नाशिक: दुचाकी अडवून अल्पवयीन युवकास त्रिकुटाने लुटले

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): वडाळारोड भागात दुचाकी अडवून अल्पवयीन युवकास त्रिकुटाने लुटल्याची घटना घडली. या घटनेत भामट्यांनी धारदार शस्त्राने वार करीत मुलाचा मोबाईल हिसकावून नेला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे प्रती किलोवॅट १५ हजाराची बचत, वीज ग्राहकांचा फायदा

अल्तमश शेख उर्फ एके,चोग्या व त्यांचा एक अनोळखी मित्र अशी युवकास लुटणा-या संशयितांची नाव आहेत. याबाबत अल्तमश शरिफ शेख (१७ रा.गुलशननगर,वडाळागाव) या मुलाने फिर्याद दाखल केली आहे. शेख गुरूवारी (दि.१६) रात्री वडाळारोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. रोझी हॉटेल भागात पाठीमागून आलेल्या भामट्यांनी शेख याच्या दुचाकीस मोटारसायकल अडवी लावून त्याची वाट अडविली.

🔎 हे वाचलं का?:  जिल्हा वार्षिक योजनेची मंजूर कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

यावेळी शिवीगाळ व दमदाटी करीत त्याच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र शेख याने प्रतिकार करताच संशयितांपैकी एकाने त्याच्यार धारदार शस्त्राने वार करून भामट्यांनी मोबाईल हिसकावून पोबारा केला. या घटनेत शेख जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत. (मुंबई पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १५४/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790