नाशिकमध्ये आजपासून उष्णता लाटसदृश्य चिन्हे

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मध्य महाराष्ट्रात रविवारी (दि.१९) काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील आठवड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

१९ ते २६ मेदरम्यान नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती राहण्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. वातावरणातील खालच्या स्तरातील द्रोणिय रेषा ही राजस्थानमधील चक्रीय स्थितीपासून ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत जात असल्याने हवामानात बदल झाला आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यास 'रेड अलर्ट'; अतिमुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790