नाशिक: चामरलेणीच्या डोंगरावर गळफास घेत महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): चामरलेणीच्या डोंगरावर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने झाडाला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१४) सकाळी उघडकीस आली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता मंगळवारी (दि.१५) सायंकाळी ओळख पटली. मनिषा अशोक चौधरी (२१, रा. सुरगाणा) असे मयत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने मागील आठवड्यात नर्सिंग सीईटीची परीक्षा दिली होती. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here