news

नाशिक: विषारी पावडर खाऊन आईची आत्महत्या; दहा महिन्यांची छकुली मायेला मुकली

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): लग्नाला जेमतेम दोन वर्षे झाले. विवाहितेने एका गॉडस छकुलीला नुकताच जन्म दिला असून ती अवघ्या दहा महिन्यांची असतानाच मातेने विषारी पावडर खाऊन आपला जीवनप्रवास संपविला. पंचवटी कारंजा परिसरात या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांत हळहळदेखील व्यक्त होत आहे.

🔎 हे वाचलं का?:  आखाती युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; गॅस टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून ESMA लागू

पंचवटी पोलिस ठाणे हद्दीतील पंचवटी कारंजा परिसरातील ज्ञानगंगोत्री अपार्टमेंटच्या सदनिकेत राहणाऱ्या साधना करण सरोज (२४) या विवाहितेने राहत्या घरी रविवारी (दि. ८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास गव्हाला कीड लागू नये, यासाठी घरात आणलेले विषारी ‘सेल्फॉस’ नावाचे विषारी पावडरचे सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच तत्काळ साधना हिला तिचा दीर शुभम याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्याप्रकरणी पती डॉ. नीलेश जेजूरकर यांच्यावर गुन्हा दाखल

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी:
यावेळी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून साधना हिला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिनेश खैरनार, पोलिस नाईक नीलेश चव्हाण यांनी विवाहितेच्या राहत्या घरी धाव घेतली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत विवाहितेचा पती हा पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोलमजुरीची कामे करतो. गेल्या दोन वर्षांपूर्वीच साधना हिचा करणसोबत विवाह झाला होता. तिला दहा महिन्यांची चिमुकली आहे. साधनाने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पंचवटी पोलिसाकडून आता केला जात आहे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790