नाशिक: तरुणाच्या खूनप्रकरणी सात संशयित जेरबंद

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): देवळाली गाव परिसरातील रोकडोबावाडी येथे मंगळवारी रात्री अरमान मूनवर शेख (१९) याचा सात जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करून निघृण खून केला होता. पोलिसांनी त्याच रात्री याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एम. जी. रोडला मोबाइल दुकानात अमली पदार्थ सेवन; एनडीपीएसखाली गुन्हा दाखल

उपनगर पोलिसांनी आकाश दिनकर, रवी राठोड उर्फ चंप्या व संदेश राजू मांगकाली उर्फ झिंग्या यांना डोबीमळा येथून अटक केली होती. इतर चार संशयित फरार होते. उपनगर पोलिसांनी संशयित आकाश काश्यप तपासे व प्रेम संतोष डेंगळे ऊर्फ टक्क्या यांना गुलाबवाडीतून तर सुमित बाळू जाधव ऊर्फ चिंक्या व सम्यक संदीप उन्हवणे यांना लहवित शिवारात अटक केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790