नाशिक: हृदयद्रावक: आजारी पत्नीची हत्या करून निवृत्त मुख्याध्यापकाची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): येथील जेल रोड परिसरातील वीर सावरकर नगर मध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षक पत्नीच्या आजारपणाला कंटाळून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने तिचा गळा दाबून हत्या करत नंतर स्वतः पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जेलरोड येथे घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. उपनगर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरलीधर रामचंद्र जोशी (७८) हे पत्नी लता जोशी (७६) यांच्यासह जेल रोडच्या वीर सावरकर नगरमधील एकदंत सोसायटीत राहात होते. दोघेही सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. २०१७ साली निवृत्तीनंतर दोघे जेलरोड येथे राहण्यास आले होते. त्यांची दोन्ही मुले मुंबईत उच्च पदावर नोकरीला आहेत. या दामप्त्याची काळजी घेण्यासाठी महिला कामाला होती. लता जोशी या सतत आजारी असायच्या. मेंदू विकारामुळे काही काळ रुग्णालयात दाखल होत्या. रुग्णालयातून घरी आल्यानंतरही त्या आजारीच होत्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

बुधवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास मुरलीधर जोशी यांनी पत्नीच्या आजारपणाला कंटाळून त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. हे करण्यापूर्वी जोशी यांनी चिठ्ठी लिहून “मला तीचे हाल बघवत नाही, माझं पत्नीवर खूप प्रेम आहे. तिला मी मुक्त करत आहे. आमच्या मरणास कोणासही कारणीभूत ठरवू नये”, असे लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घरकाम करणारी महिला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकासाठी आल्या. त्यांना ही घटना समजताच त्यांनी ११२ वर कॉल करत माहिती दिली. दाम्पत्याच्या मृत्यूची वार्ता समजताच परिसरातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली. अनेकांना रडूही कोसळले.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

या संदर्भात उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना माहिती समजतात ते व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पंचनामा करण्याचे काम पोलीस कर्मचारी करीत होते तसेच याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790