नाशिक: प्रियकराकडून प्रेयसीच्या ४ वर्षाच्या चिमुकल्याचा खून; आरोपीला अटक !

नाशिक (प्रतिनिधी): पतीपासून विभक्त होऊन लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या मुलाने उलटी केल्याचा राग आल्याने प्रियकराने चारवर्षीय बालकाचे सिंलिडरवर डोके आपटून खून केला. ही घटना पंचवटीच्या कृष्णनगर भागात घडली. पुणे जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी मंगळवारी (ता. ३) पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, घटना नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने बुधवारी (ता. ४) तो गुन्हा पंचवटी पोलिसांत वर्ग केला असून, पंचवटी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नवीन घाटांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करावीत- पालक सचिव एकनाथ डवले

वेदांश वीरभद्र काळे (वय ४) असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) येथील विवाहेतला दोन मुली व मुलगा आहे. सात महिन्यांपासून ती पतीपासून विभक्त होती. तिचे लातूरला राहणाऱ्या महेश कुंभारबरोबर प्रेम जुळले. महेशबरोबर ती पंचवटीतील कृष्णनगरमध्ये भाड्याने खोली घेऊन राहत होती. रविवारी (ता. १) रात्री अकराला घरात महेश कुंभार मुलगा वेदांशला चपाती खाऊ घालत होता. त्या वेळी वेदांशने उलटी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बीएसएनएल केबल चोरी प्रकरणात मोठा पर्दाफाश; मुंबईतून २.८८ कोटींचा मुद्देमाल जप्त, ६ अटकेत

त्याचा राग आल्याने महेशने वेदांशला चापट मारली व सिलिंडरवर त्याचे डोके आपटले. मोठी मुलगी समृद्धीने मामाने वेदांशला खूप मारल्याचे सांगितल्याने विवाहिता महेशवर ओरडली. मात्र, बेदम मारहाण केल्याने तो बेशुद्ध पडला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तो गंभीर असल्याने रात्री बसने पुणे जिल्ह्यातील कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. संशयित महेश नाशिकच्या कृष्णनगरमध्ये असल्याची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी महेशला अटक केली. याबाबत पंचवटी पोलीस स्टेशनला महेश कुंभार (वय २३) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४९२/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790