नाशिक (प्रतिनिधी): पतीसह सासू आणि दीर यांच्याकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासामुळे कंटाळून विवाहित महिलेने सोमवार (दि. ३१) एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप महिलेच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पतीसह सासू व दीर यांच्या विरोधात आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोमल सचिन मुंडावरे असे मृत महिलेचे नाव आहे.
दरम्यान, कोमल यांच्या वडिलांनी सासरकडील मंडळींना दोषी धरले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत माझी मुलगी कोमल सचिन मुंडावरे हिला तिचा विवाह झाल्यापासून, म्हणजेच सन २०१९ पासून ते दि. ३१ मार्च २०२५ रोजीपर्यंत तिचे पती सचिन मोहन मुंडावरे, तिची सासू मनिषा मोहन मुंडावरे व दीर कल्पेश मोहन मुंडावरे यांनी संगनमताने ती गर्भवती राहत नाही म्हणून व त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी सतत तिच्याशी भांडण करीत होते.
तिचा शारीरीक मानसिक छळ करीत होते. तिने त्यांचा त्रासाला कंटाळून राहते घरी महालक्ष्मी प्राइड, एकदंतनगर, उत्तमनगर येथे गळफास घेतला. म्हणून माझ्या मुलीला मृत्यूस प्रवृत्त करणारे तिचे पती सचिन मोहन मुंडावरे, तिची सासू मनिषा मोहन मुंडावरे व दीर कल्पेश मोहन मुंडावरे यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद आहे. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २४०/२०२५)
![]()


