नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील दिव्या अॅड लॅब भागात दोघा मित्रांना त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या भागातील नसल्याच्या संशयातून ही मारहणा करण्यात आली.
या घटनेत हातातील लोखंडी कड्याने मारहाण केल्याने जळगाव येथील दोघे युवक जखमी झाले असून, याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रितेश मुकेश पाटील (२५ मुळ रा. जळगाव हल्ली निसर्ग कॉलनी, पाथर्डीफाटा) या युवकाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. पाटील व शुभम माणिक माने (२१) हे दोघे मित्र शनिवारी (दि.३०) सिडकोतील दिव्या अॅड लॅब भागात गेले असता ही घटना घडली. सावतानगर येथील सायंतारा वडे वाला या दुकानासमोरून दोघे मित्र जात असतांना अज्ञात तीन जणांनी त्यांची वाट अडविली.
यावेळी त्रिकुटाने तुम्ही येथील दिसत नाही असे म्हणून कुठले ही कारण नसतांना शिवीगाळ व दमदाटी करीत दोघा मित्रांना लाथाबुक्यानी मारहाण केली. या घटनेत हातातील लोखंडी कड्याने मारहाण करण्यात आल्याने पाटील व माने जखमी झाले असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.