लग्नाचे आमिष दाखवून नाशिकच्या तरूणीला आठ लाखाला गंडा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरूणीला आठ लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आली आहे. या फसवणूक प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

सदाशिव बैजनाथ कदम (२९ रा.पोन्ना तेलंगणा) असे तरूणीस गंडविणा-या ठकबाजाचे नाव आहे. याबाबत जेलरोड भागातील २३ वर्षीय नोकरदार तरूणीने फिर्याद दाखल केली आहे. संशयित आणि तरूणीमध्ये गेल्या डिसेंबर महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरपीएफमध्ये अधिकारी पदावर असल्याचे भासविल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. याकाळात भामट्याने मुलीस थेट लग्नाची मागणी घातल्याने दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

संशयिताने लग्नाचे आमिष दाखविल्याने युवतीचा त्याच्यावर विश्वास बसला. अवघ्या काही महिन्यातच त्याने या ना कारणाने तसेच आर्थिक चणचण असल्याची बतावणी करून युवतीकडून तब्बल आठ लाख रूपये उकळले. पैसे पदरात पडताच संशयिताने संपर्क तोडल्याने युवतीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790