नाशिक। दि. २५ ऑक्टोबर २०२५: सातपूर येथील पबमधील गोळीबार प्रकरणात तुरुंगाची हवा खात असलेले संशयित आरोपी प्रकाश लोंढे, दीपक लोंढे व भूषण लोंढे या पिता पुत्रासह अन्य पाच जणांवर फसवणुकीचा अजून एक गुन्हा सातपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
जमीन बळकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जमीन बळकावून खंडणी मागितल्याचा हा आठवडाभरातील दुसरा लोंढे याच्यावर दाखल झाला आहे. फिर्यादी शाहू बाबूराव म्हस्के (७६) रा. विठ्ठलनगर, कामटवाडे यांची सातपूर शिवारातील सर्व्हे नंबर १८३/१ मध्ये २३ गुंठे शेतजमीन आहे.
जमिनीवर आरोपी शोभा ऊर्फ सखूबाई म्हस्के, राहुल म्हस्के, शोभा म्हस्के यांची मुलगी बिबाबाई यशवंत खंडेराव ऊर्फ चव्हाण व यशवंत खंडेराव ऊर्फ चव्हाण (सर्व रा. सातपूर) यांनी अतिक्रमण करून जमिनीवर कब्जा केला होता. हा कट आरोपी प्रकाश लोंढे, भूषण लोंढे व दीपक लोंढे यांनी रचल्याचे शाहू म्हस्के यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
शाहू म्हस्के यांनी ही जमीन विकण्याचा प्रयत्न केला असता प्रकाश लोंढे यांनी ते सांगतील, त्याच भावात व त्यांनाच विकण्याचे शाहू म्हस्के यांना सांगितले. ही जमीन मी कोणालाही खरेदी करू देणार नाही, अशी धमकी लोंढे यांनी शाहू म्हस्के यांना दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे करीत आहेत. लोंढे यांच्यासह शोभा म्हस्के, राहुल म्हस्के, शोभा म्हस्के, बेबाबाई चव्हाण, यशवंत चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सातपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३५८/२०२५)
![]()

