नाशिक। दि. १९ नोव्हेंबर २०२५: उद्योजकांविरोधात एमआयडीसी कार्यालयात तक्रार करत ती मागे घेण्यासाठी ३ लाखांची खंडणी मागणाऱ्या संतोष शर्मा (रा. देवळाली कॅम्प) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ३० ते ४० कंपनीमालकांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून खंडणी घेत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
उद्योजक संजय महाजन यांनी तक्रार दिली की, त्यांच्या इंडस्ट्रीजविरोधात एमआयडीसी कार्यालयात शर्माने अवैध बांधकामासंदर्भात खोटी तक्रार केली. ती मागे घेण्यासाठी तीन लाखांची खंडणी मागितली. पैसे देण्यास नकार दिल्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नकार दिला असता महाजन यांना कंपनीबाहेर बोलावून घेत पैसे दिले नाही तर इथेच मुडदा पाडेल अशी धमकी दिली. कंपनीच्या बांधकाम ठिकाणी कायदेशीर कारवाईची भीती दाखवत एक लाख रुपये खंडणी घेतली. उर्वरित दोन लाखांची मागणी करत होता.
![]()
