नाशिकरोडला भरदुपारी 8.10 लाखांची घरफोडी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक रोड येथील सिन्नर फाटा परिसरातील खर्जुल मळा येथे शनिवारी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास फ्लॅटची घरफोडी करून ८ लाख १० हजार रुपयांची चोरी करण्यात आली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय अशोक खर्जुल (३९) यांच्या राहत्या घरी शनिवारी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून कपाट उघडले. कपाटातून ८ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. यामध्ये २ लाख १० हजार रुपये किमतीची ७० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ९० हजारांचा सोन्याचा नेकलेस, १ लाख ५० हजार रुपयांचे ब्रेसलेट, २ लाख १० हजार रुपयांची सोन्याची पोत, १ लाख २० हजार रुपयांच्या राणीहार, ३० हजाराचे सोन्याचे टॉप्स असे एकूण ८ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १४०/२०२५)

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here