नाशिक: ‘जोरात का बोलतो’ अशी कुरापत काढून टोळक्याची ४५ वर्षीय व्यक्तीस बेदम मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): एवढे जोरात का बोलतो अशी कुरापत काढून बोरगड भागात टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत दगड फेकून मारण्यात आल्याने ४५ वर्षीय व्यक्ती जखमी झाला असून, याप्रकरणी चार जणांविरूध्द म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासनमान्य ग्रंथ यादी निवडीकरिता प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

गोपाळ जाधव,विचू उर्फ चोर,शुभम बनकर व तुषार जाधव अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत सुनिल जगन्नाथ बनसोडे (४५ रा.ओमकारनगर गणपती मंदिरामागे लामखेडे मळा) यांनी तक्रार दाखल केली आहे.

बनसोडे शुक्रवारी (दि.१५) बोरगड भागात गेले होते. सायंकाळच्या सुमारास ए.टी.पवार आश्रम शाळेजवळील किराणा दुकानात ते गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

संशयितांनी एवढे जोरात का बोलतो अशी कुरापत काढून बनसोडे यांना शिवीगाळ केली. यावेळी ते समजून सांगण्याचा प्रयत्न करीत असतांना टोळक्याने त्यांना दमदाटी करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी एकाने त्यांना दगड फेकून मारल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790