टीसीएस प्रकरण: संशयितांचा जामीन फेटाळला; निदाच्या जामीन अर्जावर ३० मे रोजी सुनावणी

नाशिक। दि. १६ मे २०२६: ‘टीसीएस’मधील कथित लैंगिक अत्याचार, छळ आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयितांना न्यायालयाने दिलासा नाकारला आहे. विविध गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना मोठा धक्का दिला. दरम्यान, आरोपी निदा खानच्या दुसऱ्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर ३० मे रोजी नाशिकरोड न्यायालयात सुनावणी होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विशेष पोलीस महानिरीक्षकपदी प्रवीण पडवळ; दत्तात्रय कराळे यांची बदली

या प्रकरणात शाहरूख कुरेशी, रझा मेमन, शफी शेख, आसिफ अन्सारी, आश्विनी चेनानी आणि तौसिफ अत्तार यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. जामीन अर्जांवर सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष, तपास अधिकारी आणि बचाव पक्षाचे युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतले होते. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी न्यायालयाने सर्व अर्ज फेटाळून लावले.

सरकारी पक्षाचे वकील अजय मिसर यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडताना आरोपींना जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव टाकला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तसेच पीडितांवर प्रभाव टाकण्याचा धोका असून तपासातील काही महत्त्वाच्या बाबींचा उलगडा अद्याप बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाचे धागेदोरे मलेशिया आणि मालेगावपर्यंत पोहोचत असल्याने तपास अधिक व्यापक असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

🔎 हे वाचलं का?:  भारतीय वायुसेनेच्या बीआरडी, नाशिककडून भारतीय नौदलाच्या मिग-29 के इजेक्शन सीटचे स्वदेशी ओव्हरहॉल यशस्वी

दरम्यान, विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुमारे ९०० पानी दोषारोपपत्र सोमवारी किंवा मंगळवारी न्यायालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. पहिल्या गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात असून पीडितांचे जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे निवेदन, नातलगांचे जबाब आणि डिजिटल पुरावे संकलित करण्यात आले आहेत. नोंदविण्यात आलेल्या नऊ गुन्ह्यांपैकी उर्वरित आठ गुन्ह्यांचाही तपास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंचवटीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपीला 'मरेपर्यंत फाशी'ची शिक्षा !

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अविवाहित पीडितेच्या तक्रारीवरून दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्याविरोधात बलात्कारासह धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790