नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या म्हसरूळ भागातून धक्कादायक बातमी येत आहे. आज बुधवारी (दि. १०) रोजी शहरातील दिंडोरी रोडवरील गुलमोहर नगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ ८० वर्षीय वृध्द महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
कुसुम सुरेश एकबोटे (वय ८० ) असे मयत महिलेचे नाव आहे. भरदिवसा झालेल्या या खूनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तसेच अज्ञात मारेकऱ्याचा शाेध पाेलिसांनी सुरु केला आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790