नाशिक। दि. ७ जुलै २०२५: उत्तराखंड येथील व्यावसायिकाला भगूर गावात घेऊन जात तेथील मक्याचे एक शेत दाखवून मका पुरवठा करण्याचे सांगत विश्वास संपादन करत पंचवटीमधील एका इसमाने तब्बल ११ लाख २८ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भगूर परिसरात मक्याची शेती दाखवून संशयित सतीश अजयकुमार गुप्ता (रा. पंचवटी) याने फिर्यादी अनंत अग्रवाल (२२, रा. उधनसिंहनगर, उत्तराखंड) यांना व्यवसायासाठी लागणारा मका पुरविण्याचे आश्वासन दिले. संशयित गुप्ता याने मक्याची शेती स्वतःची असल्याचे सांगितले. तसेच बांधावर घेऊन जात उभे पीक दाखवून ५ फेब्रुवारी ते ५ जुलै या कालावधीत विश्वास संपादन केला.
अग्रवाल यांची दिशाभूल करून रक्कम देण्यास भाग पाडले. यानंतर मक्याचा पुरवठाही केला नाही आणि फिर्यादीकडून घेतलेली रक्कमदेखील दिली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. (देवळाली पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ६७/२०२५)
![]()

