नाशिक: आज (दि. ६ जुलै) 5186 क्यूसेकचा विसर्ग, सतर्कतेचा इशारा

नाशिक। दि. ०६ जुलै २०२५: गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पावसाचे प्रमाण पाहता यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आज दिनांक ६ जुलै रोजी गंगापूर धरण नदी विसर्ग 4656 क्यूसेक इतका होता; तो सकाळी १० वाजता ५३० क्यूसेकने वाढ करून एकूण ५१८६ क्यूसेक करण्यात आला. गोदाकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विसर्गात टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाकडून तसेच जिल्हा प्रशासनाकडून नदीपात्रालगत जनावरे, साहित्य तत्काळ हलविण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तुमच्या दुकानात बालकामगार काम करतोय? होऊ शकते कठोर कारवाई !
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790