नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या मालकीच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी आलेल्या इसमाकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मुनिराज रामकुमार मीना (वय 49, रा. वसंतनगरी, वसई पूर्व, जि. पालघर) हे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या मालकीची नाशिकरोड येथे असलेल्या मिळकतीची पाहणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे काल (दि. 6) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सर्व्हे नंबर 7/13 ए या ठिकाणी गेले होते. त्यावेळी दोन अनोळखी इसम फिर्यादी मीना यांच्याकडे आले.
त्यांनी सुरेश वाडकर यांच्या जमिनीचे प्रकरण आमच्याकडे आहे, असे सांगितले, तसेच याबाबत तडजोड होईपर्यंत या मिळकतीकडे, तसेच जमिनीकडे फिरकायचे नाही, असे धमकावले, एवढेच नव्हे, तर या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी मीना यांच्याकडे तडजोड होईपर्यंत दरगोडे बंधूंना 15 कोटी रुपये व त्यांच्या टोळीसाठी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली, तसेच ही खंडणीची रक्कम दिली नाही, तर जिवे ठार मारण्याची धमकी फिर्यादी मीना यांना दिली.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४२/२०२४), पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.
32 Total Views , 1 Views Today