Amazon

नाशिक: ट्रकने दिलेल्या धडकेत ४४ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): आडगाव शिवारात भरधाव आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत ४४ वर्षीय पादचारी ठार झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नांदगावच्या आठवडे बाजारातील भेळभत्त्यामुळे विषबाधेचा संशय; १४० हून अधिक रुग्ण रुग्णालयात

रमेश मारूती सोनवणे (रा.काकडी केलवड ता.कोपरगाव जि.अहमदनगर) असे मृत पादचारीचे नाव आहे. सोनवणे शनिवारी (दि.३) सकाळच्या सुमारास महामार्गाने पायी जात असतांना हा अपघात झाला होता. आडगाव शिवारात भरधाव आयशरने (एमएच ४३ बीएक्स ८५२३) त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एससी, एसटी प्रवगातील युवक- युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन

याबाबत अरूण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ढापसे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790