🌞 आजचे तापमान- किमान: १४.२°C । कमाल: ३१.३ °C
🪙 सोने: १,२६,८००/१० ग्रॅम । चांदी: १,५७,०००/किलो

नाशिक: जुन्या वादातून दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला; एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काल (गुरुवारी) मध्यरात्री नाशिकरोड- जेलरोड परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यात मृत्यू झालेल्याचे नाव रितेश डोईफोडे (वय अंदाजे २५) असे असून, प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून ७.५० लाखांची फसवणूक; फरार भोंदूबाबाला अटक

घटनेनंतर हल्लेखोराने स्वतःहून नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राणघातक हल्ला मध्यरात्रीच्या सुमारास:
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १२ वाजता जेलरोड भागात दोन तरुणांवर धारदार शस्त्र आणि दगडाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रितेश डोईफोडे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘आरटीओ चलान’च्या नावाखाली फसवणूक; एपीके फाईल डाउनलोड करताच व्यावसायिकाला ४.५८ लाखांचा गंडा

हल्लेखोर पोलीस ठाण्यात हजर:
हल्ल्यानंतर आरोपीने स्वतः नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, रितेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790