LPG

नाशिक: बस प्रवासात महिलेचे १२ लाख रुपयांचे दागिने लंपास

नाशिक (प्रतिनिधी): बसप्रवासात महिलेच्या लाखो रूपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना नाशिक मुंबई दरम्यानच्या प्रवासात घडली. बॅगमध्ये ठेवलेला दागिन्यांचा डबाच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असून त्यात सुमारे १२ लाख १९ हजार रूपये किमतीचे दागिने होते. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ४० किलो गांजाप्रकरणी दोघांना १० वर्षांची सक्तमजुरी

शेवंती प्रकाश माहब्दी (रा. दहिसर मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. माहब्दी देवदर्शनानिमित्त शहरात आल्या होत्या. ९ मार्च रोजी सकाळी त्या वणी येथून देवदर्शन आटोपून महामार्ग बसस्थानकात दाखल झाल्या होत्या. नाशिक मुंबई बस प्रवासात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील दागिने असलेला स्टिलचा डबा हातोहात लांबविला. या डब्यात सुमारे १२ लाख १९ हजार रूपये किमतीचे अलंकार होते. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790