अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळ तब्बल साडेतीन लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून याप्रकरणी एका महिलेसह पुरुषाला अटक करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे !
आज (दि. १ मार्च रोजी) अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की, नाशिक रोड रेल्वे स्टेशन कडुन नाशिक रोड पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर रेल्वे स्थानकाच्या बाहेर, इसम नामे अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबु, (वय- ४५ वर्षे, रा. कमालपुरा सर्वे नं १५ आखाडा मशिदीजवळ, मालेगाव) आणि त्याची पत्नी महिला नामे शबाना अब्दुल समद अन्सारी (वय- ४० वर्षे, रा. कमालपुरा सर्वे नं १५ आखाडा मशिदीजवळ, मालेगाव) हे दोघे सकाळी ८ वाजेच्या सुमारास एम.डी.ड्रग्स विक्री करण्यासाठी येणार आहेत.
सदर संशयित आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून सापळा रचून शिताफीने आरोपी नामे अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी याच्याकडे अंदाजे ३,०७,५००/- रू. किंमतीचा ६१.५ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ तसेच महिला आरोपी इसम नामे शबाना अब्दुल समद अन्सारी हिच्याकडे अंदाजे ५२,५००/- रू किंमतीचा १०.५ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायदयासाठी बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आले.
तसेच २०,३००/- रू किं चा इतर मुददेमाल असा एकुण ३,८०,३००/- रू किं चा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपीविरूध्द नाशिकरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक: सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, संजय ताजणे, देवकिसन गायकर, पोलीस हवालदार: बळवंत कोल्हे, पोलीस अंमलदार: गणेश वडजे, अनिरूध्द येवले, योगेश सानप, बाळासाहेब नांद्रे, चंद्रकांत बागडे, महिला पोलीस अंमलदार: अर्चना भड (सर्व नेमणूक: अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर) यांनी केली आहे.
![]()


