नाशिक: प्राणघातक हल्ल्यातील सराईत गुंडाला अटक; चार महिन्यांपासून होता फरार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुंडाला सामनगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

निलेश शंकर शहा (२६, रा. सामनगाव रोड, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित गुंडाचे नाव आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून फरार होता. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार विवेकानंद पाठक, मनोहर शिंदे यांना संशयिताची खबर मिळाली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पात्र मतदारांचे नाव यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश

त्यानुसार सामनगाव रोडवरील तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात पोलिसांनी सापळा रचून संशयित निलेश यास अटक करण्यात आली.७ एप्रिल २०२४ रोजी जेलरोडच्या सानेगुरुजी नगर येथे संशयित निलेश शहा याने नितीन काकडे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हापासून निलेश फरार होता. गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाने त्यास अटक करून उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी अंमलदार विवेकानंद पाठक, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, महेश खांडबहाले, विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, प्रवीण वानखेडे यांच्या पथकाने बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790