
नाशिक (प्रतिनिधी): विनापरवाना रिव्हॉल्वर वापरणाऱ्या युवकाला नाशिक शहर पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.
नाशिक शहरात अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांवर लक्ष ठेवुन कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेशीत केले होते.
गुरुवारी म्हणजेच ३० जानेवारी २०२५ रोजी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, मलंग गुंजाळ, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, भुषण सोनवणे असे नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत होते. यावेळी पोलीस अंमलदार राजेश राठोड व गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, महाराजा बस स्टॉप, विहीतगाव, नाशिक येथे एक इसम बंदुक घेवुन येणार आहे.
त्यावरुन सदरची माहिती पोलीस उपयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजा बस स्टॉप, विहीतगाव, नाशिक या परिसरात गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला. यावेळी संशयित सोमेश्वर उत्तम हंगरगे (वय २७ वर्षे रा. फ्लॅट नं २०१, स्वागत ए बिल्डींग, महाराजा बस स्टॉप, विहीतगाव, लॅमरोड, नाशिक) यास पोलीसांची चाहुल लागताच तो स्वागत बिल्डींग कडे पळत सुटला असता पथकाने त्यास पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ रिव्हॉल्वर व १ काडतुस असा एकुण ३०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. सदरचे ०१ रिव्हॉल्वर (अग्नीशस्त्रे) व ०१ काडतुस हस्तगत करण्यात आले असुन सदर इसमावर भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे व विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणेचे ताब्यात देवुन गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, भुषण सोनवणे, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.
![]()


