गुन्हे शाखा अंबड पथक व गंगापुर पोलीस ठाण्याची संयुक्त उल्लेखनीय कामगिरी

नाशिक। दि. २८ ऑक्टोबर २०२५: नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला आरोपीतांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असतांना पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत एक इसम चोरीचा मोबाईल फोन विक्री करण्यासाठी गंगापुर रोड, बारदान फाटा परिसरात येणार असल्याची माहीती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपुत यांनी पथकास खात्री करून याबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी गंगापुर रोड, बारदान फाटा, नाशिक या ठिकाणी सापळा लावुनसंशयित महेश बळीराम शिरसाठ (वय: ३३, राहणार: विजया सोसायटी, रूम नंबर २७, साई मंदिराच्या बाजुला, आनंद छाया कॉलनी, अशोक नगर, सातपुर, नाशिक) यास ताब्यात घेतले.
त्याच्या अंगझडतीत एक ओपो कंपनीचा मोबाईल फोन, दोन नग सोन्याच्या रिंग व एक नग चांदीची गळयातील चैन असा एकुण २०,१००/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. या मुद्देमालाबाबत महेश शिरसाठ याच्याकडे सविस्तर विचारपुस केली असता त्याने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात दारूच्या नशेत ध्रुवनगर, धर्माजी कॉलनी येथील नाल्याजवळ बंद असलेल्या एका रो हाउसचे कुलूप तोडुन रात्रीच्या वेळी चोरी केल्याचे सांगितले.
त्याबाबत गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर २१४/२०२५, भा.न्या. सं. कलम ३०५ (अ), ३३१(३)(४) प्रमाणे दि. ०२/०९/२०२५ रोजी १८.४६ वा. गुन्हा दाखल असुन सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. संशयित महेश शिरसाठ याच्यावर आतापर्यंत एकूण १६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, अंमलदार: भगवान जाधव, चारूदत्त निकम व सविता कदम (नेमणूक: अंबड गुन्हे शाखा) तसेच मच्छिन्द्र वाकचौरे, गांगुर्डे, (नेमणूक गंगापुर पोलीस ठाणे) यांनी केली आहे.
![]()

