🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: अवैधरित्या शस्त्र बाळगणारा अटकेत; पिस्टल, कोयता जप्त

नाशिक। दि. २५ जून २०२५: घातपाताच्या उद्देशाने गावठी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि कोयता बाळगणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. खंडणीविरोधी पथकाने मुंबईनाका येथे ही कारवाई केली. जोसेस भालचंद्र तेजाळे (३४ रा. हॅप्पी होम कॉलनी) असे या संशयिताचे नाव आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या इराणीला अटक; १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

सदरची कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक रविंद्र दिघे, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार चारूदत्त निकम, भगवान जाधव, मंगला जगताप व सविता कदम यांनी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790