
नाशिक। दि. २४ नोव्हेंबर २०२५: शहरात घरफोडी करणाऱ्या संशयिताला अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल २१ लाख ७८ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. चोरीच्या पाच गुन्ह्यांची कबुली त्याने दिली.
महेश रमेश पिंगळे (३७, रा. गणेश कॉलनी, वरचे चुंचाळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अंबड गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर यांना घरफोड्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार संशयित महेश पिंगळे याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत त्याने अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबुल केले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ -०२) किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत व अंबड पोलीस ठाणेचे क्राईम पोलीस निरिक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, हवालदार योगेश देसले, पोलीस शिपाई सचिन करंजे, अनिल गाढवे, फरिद ईनामदार, मयुर पवार, संजय सपकाळे, वैभव एखंडे आणि तुषार मते यांच्या पथकाने केली.
![]()


