
नाशिक (प्रतिनिधी): रिक्षा चालकांना मोबाईलमध्ये लोकेशन मागवण्याचा बहाणा करत मोबाइल घेऊन पळून जाणाऱ्या सराईताला अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे संशयिताने १६ मोबाईल, ४ दुचाकी चोरी केल्याचे तपासात समोर आले. नितीन काळे (रा. गाडेकर मळा, नाशिकरोड) असे या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी पथकाचे समीर शेख, राजेंद्र नाकोडे यांना एकजण दुचाकी विक्री करण्यास येत असल्याचे पथकाने सापळा रचला. विनानंबरची मोपेड घेऊ येणाऱ्या इसमाला थांबण्याचा इशारा केला मात्र तो पळू लगला. त्याची चौकशी केली असता दुचाकीचोरीची असल्याचे सांगितले. दुचाकीच्या डिक्कीत ४ मोबाईल मिळून आले. सराईत रिक्षा ठरवत लोकेशन घेण्याचा बहाणा करत रिक्षाचालकाकंकडून मोबाईल घेऊन पळून जात होता.
संशयित हा हॉस्पिटल, बसस्थानक येथे चावी विसरलेल्या दुचाकींवर लक्ष ठेवायचा. अशाप्रकारे ४ दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली. संशयितांकडून मुंबईनाका, अंबड, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे ७ गुन्हे उघडकीस आले. वरीष्ठ निरीक्षक संतोष नरुटे, सुधीर पाटील, सतिश शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.