नाशिक। दि. ११ जून २०२५: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून उत्तरप्रदेशमधील मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेला रईस मंजूर शहा (२७, रा. पखालरोड, मूळ: उत्तरप्रदेश) याला सात तासांत इंदिरानगरच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार आरोपीला अटक करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरिक्षक तृप्ती सोनवणे यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरिक्षक सुनील अंकोलीकर यांना याबाबत तपास करत कारवाईची सूचना केली. पथकाने तपासचक्रे फिरवली.
पोलिस उपनिरीक्षक संतोष फुंदे, सागर परदेशी, दीपक शिंदे, योगेश जाधव, प्रमोद कासुदे, चंद्रभान पाटील यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी गाव गाठले. तेथे दुर्गम भागात डोंगरदऱ्यात दडून बसलेल्या शहा यास शिताफीने जाळ्यात घेतले. रईस हा त्याच्या उत्तर प्रदेश येथील मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
![]()

