🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: अल्पवयीन मुलांना हाताशी धरून चेनस्नॅचिंग; चार लाखांचे सोने केले जप्त

नाशिक (प्रतिनिधी): शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांकडून संशयितांचा शोध घेत मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. गंगापूर पोलिसांनी अशाच एका टोळीचा पर्दाफाश करत एकास बेड्या ठोकल्या आहेत.

दोघा अल्पवयीन मुलांना हाताशी धरून संशयित आरोपी अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दुल (२०, रा. गोवर्धन) हा सोनसाखळी चोरी करायचा. त्याच्या ताब्यातून ३ लाख ९५ हजार ७०० रूपये किमतीचे सोने त्रिमूर्ती चौकातील सराफा व्यावसायिक संशयित विलास प्रमोद विसपुते यास विक्री केले होते. या गुन्ह्यात अटक करून सोने हस्तगत केले आहे. गंगापूर पोलिसांनी महिनाभरात दुसऱ्यांदा चेन स्नॅचिंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सावाना'त शनिवारी (दि. २१) ‘स्वर-सावाना’चे १९ वे पुष्प; गायिका आयेशा मुखर्जी यांचे सादरीकरण

अंड्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यासोबत १७ वर्षांचा विधिसंघर्षित बालकावरदेखील यापूर्वीही जबरी चोरीचे दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी (दि.४) फिर्यादी रोहिणी पाटील या दुचाकीने गंगापूर रोडवरून प्रवास करत होत्या. यावेळी दोघांनी त्यांच्या पाठीमागून येत गळ्यातील सोनसाखळी हिसकावून धूम

🔎 हे वाचलं का?:  शुक्रवारपासून दहावीची परीक्षा

ठोकली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंगापूरचे प्रभारी पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शोध पथकाला दिले होते.

पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, अंमलदार गिरीष महाले, रवींद्र मोहिते, राकेश राऊत, तुळशीदास चौधरी, गोरख साळुंके, सोनू खाडे, मच्छिंद्र वाकचौरे आदींनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे गंगापूर परिसरात सापळा रचला. यावेळी तेथे हे तिघे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली त्यांनी विविध गुन्ह्यांची कबुली दिली. शहरातील सात व पिंपरी चिंचवड येथील दोन असे नऊ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गंगापूर पोलिसांना यश आले आहे. शहरातील पाच गुन्ह्यांमधील मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत तपास सुरू असल्याचे राजपूत यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

अल्पवयीनाचे सराफासोबत ‘साटेलोटे’:
अल्पवयीन गुन्हेगार हादेखील सराईत असून तो तीन महिन्यांपूर्वीच रिमांड होममधून बाहेर आला होता. त्याचे आणि विसपुते सराफाचे साटेलोटे असून अंड्या त्याच्याकडे चोरी केलेले सोने विल्हेवाट करण्यासाठी देत होता, असे तपासात समोर आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790