नाशिक: माडसांगवीत कोयता घेऊन दहशत माजवणारा जेरबंद

नाशिक। दि. ८ एप्रिल २०२६: माडसांगवी परिसरात रात्रीच्या वेळी हातात धारदार कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या ३२ वर्षीय संशयिताला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढत ही कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक येथे 9 एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

या प्रकरणी समाधान काळू बदादे याच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. सोमवारी (दि. ६) रात्री माडसांगवी परिसरात एक व्यक्ती कोयता घेऊन नागरिकांना घाबरवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ शोधमोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘अमृत’ च्या लक्षित गट परिवार सर्वेक्षणाचे जिल्ह्यात आयोजन

दरम्यान, पोलिस हवालदार मनोज परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित हा चार नंबर ६ जवळील लॉन्सच्या मागील बाजूस थांबलेला असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790