नाशिक: तडीपार सराईत गुन्हेगारास गावठी कट्टा, काडतुसासह अटक

नाशिक। दि. ६ जानेवारी २०२५: येथील साईनगर परिसरात एका तडीपार गुन्हेगाराकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस नाशिकरोड पोलिसांनी जप्त केले. संशयितास अटक करण्यात आली आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरात रविवारी (दि. ४) रात्री सराईत गुन्हेगार कृष्णा चंदू चव्हाण (२३, रा. अश्विनी कॉलनी, सामनगावरोड) हा एका व्यक्तीला ३० हजार रुपये किमतीचा आणि देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा जिवंत काडतुसांसह विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलिस शिपाई समाधान वाजे यांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनानुसार, पोलिसांनी सापळा रचत चव्हाणला ताब्यात घेतले.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790