
नाशिक। दि. ३ डिसेंबर २०२५: सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भुषण लोंढे व त्याचा साथीदार यांना नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आली. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली.
गुन्हा घडल्यापासून भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग हे फरार होते. दि. १५ नोव्हेंबर रोजी रोजी गुन्हेशाखा युनिट २ चे पथक हे सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी बडौत जिल्हा बागपट उत्तरप्रदेश येथे गेल्यानंतर भुषण लोंढे व त्याचे साथीदार तेथे असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पथक त्याला पकडण्यासाठी जात असतांना त्याला पोलिसांची चाहूल लागली. ही चाहूल लागताच पोलीस अटक करू नये व आपण पोलीसांच्या ताब्यात सापडु नये यासाठी आरोपी राहुल गायकवाड व भुषण लोंढे याने राहत्या ठिकाणाहुन खाली उडी मारून पळुन गेला होता परंतु त्यावेळेस त्याच्या पायास गंभीर दुखापत होवुन पाय फॅक्चर झाला होता.
त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार हे आरोपींचा शोध घेत असतांना सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), डॉ. समाधान हिरे, हवालदार प्रकाश महाजन यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी हे राज्यस्थान व उत्तरप्रदेश राज्यात फिरत असले बाबत माहिती प्राप्त झाली.
ही माहिती पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त किशोर काळे (परिमंडळ-२) व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांना देण्यात आली. त्यांनी गुन्हेशाखा युनिट क २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन करून टिम यांना राज्यस्थान येथे पाठविण्याची परवानगी दिली.
त्यावरून गुन्हेशाखा युनिट क २ चे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, हवालदार सुनिल आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, पोलिस अंमलदार महेश खांडबहाले अशांचे पथक जि. कोटपुतली राज्यस्थान येथे गेले. तांत्रिक विश्लेषण करून अहोरात्र परिश्रम घेवुन कोटपुतली राज्यस्थान येथे जावुन शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी सापडले नाही.
त्याठिकाणी मानवी कौशल्याचा वापर करून माहिती घेण्यात आली असता मुख्य संशयित आरोपी भुषण लोंढे व प्रिन्स सिंग हे नेपाळ बॉर्डर जवळ राहत असल्याचे पथकाला समजले. त्यावरून पोलिसांचे पथक कोटपुतली राज्यस्थान वरून नेपाळ बॉर्डर जवळील उत्तर प्रदेश राज्यातील महराजगंज गावात गेले. तेथे अहोरात्र परिश्रम करून सापळा लावून कोल्हुई महराजगंज उत्तरप्रदेश येथुन १) भुषण प्रकाश लोंढे (वय: ३५ वर्षे रा. स्वारबाबा नगर, सातपुर, नाशिक आणि प्रिन्स चित्रसेन सिंग (वय: ३६ वर्षे, रा. फ्लॅट न.२०१ गुरुकृपा अर्पाटमेंट जगताप मळा, सिडको, नाशिक) यांना ताब्यात घेऊन महराजगंज उत्तरप्रदेश येथील न्यायालयात हजर करून त्यांचा ट्रान्झिट वॉरंट घेण्यात आला. या दोन्ही आरोपींना पुढील कारवाई साठी युनिट २ चे पथक नाशिक येथे घेवुन येत आहे.
नाशिक शहर पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिक कौतुक करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), संदिप मिटके, सहायक पोलीस आयुक्त (अंबड विभाग) सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनिल आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, अंमलदार महेश खांडबहाले यांनी पार पाडली. तसेच तांत्रिक विश्लेषण टीमचे महिला सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे व अंमलदार यांनी वेळोवेळी मदत केली आहे.
![]()


