🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: वाहन चोरी करणारा जेरबंद, चार दुचाकी जप्त !

नाशिक। दि. ३ ऑगस्ट २०२५: पंचवटी परिसरात वाहन चोरी करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे गौरी पटांगण येथे ही कारवाई केली. सागर उर्फ सँगी रमेश सकट (रा. पिंपळगाव हल्ली रा. द्वारका) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चार

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड; 'या' ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित

दुचाकी जप्त केल्या. पथक दुचाकी चोरी झालेल्या ठिकाणी तपासणी करत असताना सीसीटीव्हीमध्ये एक संशयित दिसून आला. त्याचा माग काढत गौरी पटांगण येथे शोध घेतला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली.

त्याने अल्पवयीन मुलाच्या मदतीने पंचवटी, उपनगर, त्र्यंबकेश्वर येथून दुचाकी चोरी केल्याची कबूली दिली. वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, संपत जाधव, महेश नांदुर्डीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790