नाशिक (प्रतिनिधी): रामकुंड परिसरात भाविकांच्या वस्तू, मोबाइल, बॅगा चोरी करणाऱ्या सराईताला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने सीबीएस परिसरात ही कारवाई केली. शरद शंकर जाधव (रा. दत्त चौक, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे विशाल काठे यांना शरद जाधव नावाची व्यक्ती रामकुंड परिसरात मोबाइल, भाविकांच्या वस्तू चोरी करत असल्याचे समजले. सीबीएस परिसरात वास्तव्य करत दुपारी रामकुंड येथे फिरुन ही व्यक्ती चोऱ्या करत होती. पथकाने सीबीएस परिसरात सापळा रचत संशयिताला रात्री ताब्यात घेतले. नाव विचारले असता त्याने शरद जाधव नाव सांगितले. अधिक चौकशी केली असता रामकुंड परिसरात चोऱ्या केल्याची त्याने कबुली दिली. संशयिताकडून ३० हजारांचे मोबाइल जप्त करण्यात आले. संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार प्रदिप म्हसदे, पोलीस हवालदार रमेश कोळी, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.
![]()


