नाशिक: वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणारा अड्डा उद्धवस्त; ६३ सिलेंडर जप्त; तिघांना अटक !

नाशिक (प्रतिनिधी): देवळाली गावात घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरणा करणारा अड्डा गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने उद्धवस्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ६३ घरगुती गॅस सिलिंडर, ३ वजन-काटे, ४ यंत्र असा सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणात अड्डा चालविणाऱ्या शिवा लोणारे, शाकीर मोहम्मद शहा, नवाज अहमद शहा या ३ संशयितानां भारत गॅस कंपनीच्या घरगुती सिलिंडरमधील गॅस मशीनद्वारे खाजगी वाहनांमध्ये भरत असताना ताब्यात घेतले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

नाशिकरोड परिसरात विनापरवाना बेकायदेशिररित्या गॅस सिलिंडरमधून मशिनद्वारे ज्वलनशिल स्फोटक पदार्थ (गॅस) खाजगी वाहनांमध्ये भरण्याचा अवैध व्यवसाय सुरू होता. गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने देवळाली गाव येथील पाटील गॅरेजच्या पाठीमागे भारती मठाजवळ, पत्राचे शेड येथे छापा टाकला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

तेथे घरगुती वापराचे ६३ गॅस सिलिंडर, ३ वजन-काटे आणि सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणारे ३ मशीन आढळून आले. ही कारवाई होताच वाहनधारकांनीही पळ काढला. अड्डा चालविणाऱ्या संशयित तिघांवर जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

ही कारवाई गुन्हेशाखा. युनिट २ चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, चालक पोलीस अंमलदार सुनिल खैरनार, प्रविण वानखेडे यांच्या पथकाने केली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here