नाशिक: अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या! युनिट दोनची कामगिरी; 21 तोळे सोने जप्त

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): उपनगर, इंदिरानगर हददीत तीन घरफोड्या करणाऱ्या परजिल्ह्यातील अट्टल घरफोड्याला शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. चौकशीतून तीन घरफोड्याची उकल झाली असून, सुमारे १२ लाखांचे २१ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

अजय राजू वाघेला (२६, रा. गामणे मळा, मखमलाबाद शिवार, नाशिक. मुळ रा. रावेर रेल्वे स्टेशनजवळ, बोर झोपडपटटी, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल घरफोड्या संशयिताचे नाव आहे. पोलीस तपासातून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. शहरातील घरफोडी व चाेरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हेशाखेला निर्देश दिलेले होते.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

त्या अनुषंगाने तपास सुरु असतानाच बुधवारी (ता.३१) युनिट दाेनचे अंमलदार प्रकाश भालेराव, शंकर काळे यांना संशयित घरफोड्याची खबर मिळाली होती.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

संशयित राजू घरफोड्यातून मिळालेल्या रकमेतून पिकअप घेणार असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, राजेंद्र घुमरे, सुनिल आहेर यांनी सिन्नरफाटा येथील महापालिका दवाखान्याजवळून वाघेला यास शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीतून उपनगर, इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल घरफाेडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. सदरची कामगिरी अंमलदार प्रकाश भालेराव, शंकर काळे, गुलाब सोनार, संजय बोडके, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, विजय गांगुर्डे आदींनी बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790