नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून नाशिक शहरातून मोटार सायकल चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून रविवार कारंजा येथे सापळा लावण्यात आला. यावेळी यश सुनील अहिरे (वय: २३, रा. निमाणी चाल, रविवार पेठ नाशिक, मूळ: जय माँ निवास, पारगाव रोड, ता. येवला) यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने सांगितले की, तो आणि त्याचे तीन साथीदार (विधिसंघर्षित बालक) यांनी संगनमताने मॉडर्न चौक, कॉलेज रोड येथून एक ऍक्टिवा मोपेड चोरली आहे. ही गाडी त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केली आहे. संशयित आरोपीला पुढील तपासासाठी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, पोलीस हवालदार किशोर रोकडे, भरत डंबाळे, पोलीस नाईक योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, भगवान जाधव, गणेश वडजे, चारुदत्त निकम, महिला पोलीस हवालदार मंगला जगताप आणि सविता कदम यांच्या पथकाने केली.